निळ्या घागऱ्यात खुलले शर्वरी कुलकर्णीचे सौंदर्य

मराठी मनोरंजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे शर्वरी कुलकर्णी-बोरकर.

सध्या शर्वरीने सोशल मीडियावर पोस्ट केलेले नवे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

या फोटोशूटसाठी शर्वरीने निळ्या रंगाचा आकर्षक डिझायनर घागरा परिधान केला आहे.

निळ्या रंगाची नेटची ओढणी तिच्या या पारंपरिक पेहरावाला एक वेगळाच लुक देत आहे.

या सुरेख पोशाखावर तिने गळ्यात मोती आणि सोन्याचा चोकर हार, जुळणारे झुमके घातले आहेत.