शिवानी रांगोळेने आजे-सासूबाईंच्या साडीपासून शिवला वेस्टर्न ड्रेस

शिवानीने नुकतीच एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शिवानीने आजे-सासूबाईंच्या पारंपरिक साडीपासून शिवलेला अतिशय सुंदर आणि आकर्षक ड्रेस परिधान केला आहे.

या काळ्या रंगाच्या वेस्टर्न कट ड्रेसच्या बाह्यांवर साडीचा पारंपरिक सोनेरी व जांभळा काठ अतिशय देखण्या पद्धतीने वापरण्यात आला आहे.