‘तारिणी’ मालिकेतील अश्विनी गोरलेच्या पैठणी ड्रेसची चर्चा

अश्विनीच्या या लुकमध्ये नारिंगी रंगाचा ब्लाऊज लक्ष वेधून घेत आहे. 

ब्लाऊजला ऑफ शोल्डर स्टाइल देण्यात आली असून त्यावर पैठणीसारखी नक्षी आहे. 

पारंपरिक कपड्यांना वेस्टर्न टच देण्याचा हा प्रयोग तिच्या लुकला हटके बनवत आहे.

हिरव्या रंगाच्या ड्रेसवर सोनेरी रंगाची छोटी नक्षी दिसत आहे. 

नारिंगी आणि हिरव्या रंगसंगतीमुळे तिच्या पोशाखाला पारंपरिक बाज मिळाला आहे.

पैठणीच्या रंगांना आधुनिक डिझाइनमध्ये सादर करण्याचा प्रयत्न यामध्ये पाहायला मिळतो.