Kashinath Date : पारनेर : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (farmers) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि पीक व्यवस्थापनासाठी वापरली जाणारी आवश्यक साधने, सामग्री आणि संसाधने रास्त दरात उपलब्ध व्हावीत. ज्यामध्ये प्रामुख्याने सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन सुविधा, कृषी यंत्रे (ट्रॅक्टर, अवजारे) आणि ऊर्जा (वीज/डिझेल) यांचा समावेश होतो, एकंदरीतच ज्यांच्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत होते त्यासाठी पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे (Parner-Nagar Assembly Constituency) आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) यांनी विधानसभेत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले.
नक्की वाचा : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न
खतांचा पुरवठा वेळेत आणि योग्य दरात मिळावा
खत विक्रीत होत असलेल्या अनियमितता आणि लिंकींगच्या प्रकारांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी सभागृहात ठाम भूमिका मांडली. आमदार दातेंनी अहिल्यानगर जिल्ह्यात शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि पीक व्यवस्थापनासाठी वापरली जाणारी आवश्यक साधने, सामग्री आणि संसाधने विक्रीत अनियमितता आढळल्याने काही कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामात खतांचा पुरवठा वेळेत आणि योग्य दरात मिळावा यासाठी शासनाने कोणती पावले उचलली आहेत, असा सवाल त्यांनी केला.
अवश्य वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण
२ लाख ६६ हजार मेट्रिक टन खतांचा कोटा मंजूर (Kashinath Date)
या प्रश्नावर उत्तर देताना कृषी विभागाच्या वतीने मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, सन २०२५–२६ या वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २ लाख ६६ हजार मेट्रिक टन खतांचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. मागणीनुसार खतांचा पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात खतांचा नियमित पुरवठा राहावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने देखरेख केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या सुमारे ३ हजार २८८ खत परवानाधारक विक्रेते कार्यरत असून तालुकास्तरीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तसेच भरारी पथकांमार्फत विक्रेते आणि उत्पादकांची नियमित तपासणी केली जात आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
विक्रेते व कंपनी प्रतिनिधींच्या बैठका घेऊन स्पष्ट सूचना
जानेवारी अखेरपर्यंत झालेल्या तपासणीत अनियमितता आढळून आलेल्या २४ कृषी सेवा केंद्रांवर खत नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहितीही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खतांचे लिंकींग होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विक्रेते व कंपनी प्रतिनिधींच्या बैठका घेऊन स्पष्ट सूचना दिल्या आहे. प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर खतांचा उपलब्ध साठा आणि दर याबाबत माहिती फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.



