पिवळी नऊवारी साडी, केसांत चाफ्याची फुले; बांदेकरांच्या सुनेचा मराठमोळा लूक

अभिनेत्री पूजा बिरारी तिच्या खास मराठमोळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी करतानाचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

या खास प्रसंगासाठी पूजाने पिवळ्या रंगाची आकर्षक पैठणी नऊवारी साडी परिधान केली होती.