बिहारच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर यांची.

मैथिली ठाकूर यांनी या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे.

भाजपाला जो मतदारसंघ यापूर्वी कधीच जिंकता आला नव्हता त्या मतदारसंघात मैथिली यांनी भाजपाचं कमळ फुलवलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाला पहिल्या जेन-झी (Gen Z) आमदार मिळाल्या आहेत. 

त्या बिहारमधील अलीनगर मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या.

मैथिली ठाकूर यांनी राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार बिनोद मिश्रा यांचा ११,७३० मतांनी पराभव केला आहे.