मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाचे आंदोलन मुंबईत जोरदार सुरू आहे.
मनोज जरांगे यांच्यासोबत साधारण १० ते १२ हजार आंदोलक हे मुंबईत दाखल झालेत.
मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झाल्यामुळे अनेक भागांमध्ये गर्दी झाली आहे.
नवी मुंबई मार्गे आलेल्या आंदोलकांची वाहने गोवंडी आणि आसपासच्या परिसरात लावली आहेत.
चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसर आंदोलकांनी भरून गेला आहे.