लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वनंदी बेर्डे सध्या आपल्या लूकमुळे चर्चेत आहे.

स्वनंदीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

या फोटोशूटसाठी स्वनंदीने लाल रंगाच्या प्लेन साडीची निवड केली आहे.

या लाल साडीला अधिक उठाव देण्यासाठी हिरव्या रंगाचा ब्रोकेड ब्लाऊज परिधान केला आहे.

केवळ साडीच नाही, तर स्वनंदीने त्याबरोबर परिधान केलेल्या दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

स्वनंदीने या फोटोंना ‘मनमोहना’ असे साजेसे कॅप्शन दिले आहे.