नगर: अवघ्या १० महिन्यांच्या अलिन शेरिन अब्राहमला (Aline Sherin Abraham) साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. ती राज्यातील सर्वात लहान वयाची ऑर्गन डोनर (10 Month Old Donor) ठरली. शेरिनच्या आई, वडिलांनी घेतलेला निर्णय पाच कुटुंबांसाठी वरदान ठरला. अलिनला शासकीय इतमामात अखेरचा निरोप (A final farewell with state honors) देण्यात आला.
नक्की वाचा: अजित पवारांच्या निधनानंतर ‘त्या’७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला?
नेमकं काय घडलं होत? (10 Month Old Donor)

केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील मल्लापल्ली येथील अलिन शेरीन अब्राहम ही १० महिन्यांची चिमुकली ५ फेब्रुवारीला दुपारी अडीचच्या सुमारास झालेल्या अपघातात ती गंभीर जखमी झाली. ती आपल्या आई आणि आजी-आजोबांसह कोट्टायमहून तिरुवल्लाकडे एम.सी. रोडने प्रवास करत होती. यावेळी समोरून आलेल्या कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात अॅलिनला गंभीर दुखापत झाली, तर तिची आई आणि आजी-आजोबा देखील जखमी झाले होते. सुरवातीला तिला चंगनाश्शेरी आणि तिरुवल्ला येथील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर ७ फेब्रुवारीला तिला कोची येथील अमृता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही १३ फेब्रुवारीला तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.त्यानंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या १० महिन्यांच्या चिमुकलीला गमवण्याचं दुःख हे फक्त तिचे आई आणि वडीलच समजू शकतात. तरीदेखील अश्या कठीण प्रसंगी देखील अलिनचे वडील अरुण अब्राहम आणि आई शेरिन अॅन जॉन यांनी काळजावर दगड ठेवत तिचे अवयव दान करण्यास संमती दिली. सोशल मीडियावर सगळीकडे अलीनने दिलेल्या या योगदानाची चर्चा होत आहे.
अवश्य वाचा: खुशखबर!सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण;आजचे दर वाचा…
अलीनचे अवयवदान कुणाला ? (10 Month Old Donor)
अलिनचे यकृत तिरुअनंतपुरम येथील किम्स हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या सहा महिन्यांच्या बाळाला प्रत्यारोपित करण्यात येणार आहे. राज्यात मृत्युपश्चात अवयवदानातून यकृत मिळवणारे हे सर्वात लहान बाळ ठरणार आहे. तर तिचे दोन्ही मूत्रपिंडे तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजच्या एसएटी रुग्णालयातील एका बालकाला दिली जाणार आहेत. १० महिन्यांच्या अवयवदात्या अलिन शेरीन अब्राहमचा मृतदेह रविवारी मल्लापल्ली येथील तिच्या घरी आणण्यात आला.
अलिनचे लिव्हर कोची येथील सहा महिन्यांच्या ध्रिया या मुलीला लावले जाणार आहे. तिचे हार्ट वॉल्व तिरुअनंतपुरम येथील श्री चित्रा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीला दान करण्यात आल्या आणि तिचे कॉर्निया कोची येथील एम्स आय बँकेत ठेवण्यात आले. १० महिन्यांच्या अवयवदात्या अलिन शेरीन अब्राहमचा मृतदेह रविवारी मल्लापल्ली येथील तिच्या घरी आणण्यात आला.अंत्यसंस्कारापूर्वी मोठ्या संख्येने कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि स्थानिक लोक तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते. पथनमथिट्टा येथे राजकीय सन्मानासह या चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मंत्री आणि राजकीय नेते उपस्थित होते.



