Jhansi Fire:झाशीमध्ये मृत्यूतांडव!रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू

0
Jhansi Fire:झाशीमध्ये मृत्यूतांडव!रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू
Jhansi Fire:झाशीमध्ये मृत्यूतांडव!रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू

नगर : उत्तर प्रदेशमध्ये झाशीमध्ये (Jhansi Fire) शुक्रवारी (ता.१६) रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. रुग्णालयात आग (Hospital Fire) लागून १० नवजात अर्भकांचा (10 Neonatal deaths) या आगीत होरपळून मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या शासकीय रुग्णालयात ही आग लागली. नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नक्की वाचा : “मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही”- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त (Jhansi Fire)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेवर सोशल मिडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एकीकडे आग विझवण्याचे काम चालू असताना दुसरीकडे आगीत सापडलेले इतर नवजात अर्भक व रुग्णांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली. आगीच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात काही काळ मोठी गर्दी आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

अवश्य वाचा : जनधन खाते सुरु ठेवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य; केंद्रसरकारचा निर्णय

आग लागण्याचे कारण काय ?(Jhansi Fire)

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील आतल्या वॉर्डमध्ये प्रामुख्याने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचं सांगितलं जात असून त्याबाबत सखोल तपास करण्यासाठी तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “अतिदक्षता विभागातील बाहेरच्या वॉर्डमधल्या सर्व अर्भकांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आलं आहे. मात्र, आतल्या वॉर्डमध्ये असणाऱ्या १० अर्भकांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक रुग्णांनाही वाचवण्यात यश आलं आहे”, अशी माहिती झाशीचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here