ST Exam: १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये सामावून घेणार-भरत गोगावले   

0
ST Exam: १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये सामावून घेणार-भरत गोगावले   
ST Exam: १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये सामावून घेणार-भरत गोगावले   

ST EXam : सन २०१९ च्या सरळ सेवा भरती अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या (ST Service)सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले (Bharat Gogavale)यांनी दिली.

नक्की वाचा : ‘माझी राजकीय भूमिका पवार साहेबांच्या संमतीनेच’-अजित पवार

३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया सुरु (ST Exam)

२०१९ च्या भरतीमध्ये निवड झालेल्यांपैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरतीमधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येत आहे. तसेच, प्रतीक्षा यादीवरील उर्वरित ७२१ उमेदवारांना आवश्यकतेप्रमाणे व रिक्त जागेनुसार राज्य परिवहन सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात संबंधित उमेदवार, लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महामंडळ अध्यक्ष भरत गोगावले यांना भेटून निवेदन सादर केले होते. त्यांच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना तातडीने नेमणुका देण्याच्या सूचना अध्यक्ष भरत गोगावले यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार संबंधितांना नेमणुका देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या सर्व उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अध्यक्ष भरत गोगावले यांचे आभार मानलेत.

अवश्य वाचा : राज्यात आजपासून पुन्हा पावसाची शक्यता,हवामान विभागाचा अंदाज

 ई-शिवनेरी बसमध्ये दिसणार हवाई सुंदरी (ST Exam)

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे असे  प्रतिपादन एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीमध्ये केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here