10th and 12th exams : आता दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी भरारी पथकासह ड्रोनची राहणार नजर 

10th and 12th exams : आता दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी भरारी पथकासह ड्रोनची राहणार नजर 

0
10th and 12th exams : आता दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी भरारी पथकासह ड्रोनची राहणार नजर 
10th and 12th exams : आता दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी भरारी पथकासह ड्रोनची राहणार नजर 

10th and 12th exams : नगर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे (Students) प्रात्यक्षिक जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू आहेत. यंदा पहिल्यांदाच बोर्डाने दहावी- बारावीच्या लेखी परीक्षांप्रमाणे (10th and 12th exams) प्रात्यक्षिक परीक्षा पारदर्शक व्हावी, यासाठी भरारी पथके (Flying Squads) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या भरारी पथकाला शाळांमधील लॅब, प्रयोगशाळेचे फोटो, जर्नल, विद्यार्थी प्रयोग करतानाचे फोटो बोर्डाला पाठवावे लागणार आहेत.

हे देखील वाचा: मुंबई महापालिका महापौर पदासाठी हालचालींना वेग;शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

लेखी परीक्षेवेळी पर्यवेक्षकांमध्येही सरमिसळ

नगर जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ११६ तर दहावीच्या विद्यार्थ्यांची १८९ परीक्षा केंद्रे असणार आहेत. प्रत्येक केंद्राला पक्के वॉल कंपाऊंड आहे. तेथील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत आणि परीक्षेवेळी शाळा परिसरात ड्रोन वापरला जाणार आहे. लेखी परीक्षेवेळी पर्यवेक्षकांमध्येही सरमिसळ (आपल्या शाळेचे विद्यार्थी ज्या केंद्रांवर नाहीत तेथे पर्यवेक्षक) असणार आहे. तत्पूर्वी होणार्‍या प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षेतही बोर्डाने लक्ष घातले आहे. प्रत्येक शाळांवर जाणार्‍या बहिस्थ: परीक्षकांची नावे बोर्डाकडूनच अंतिम केली जाणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी अचानक भेटी देणार्‍या भरारी पथकात गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी असणार आहेत.

नक्की वाचा: महापालिकेत आता पाच ऐवजी सहा स्वीकृत सदस्य!

प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा असेल (10th and 12th exams)

इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पारदर्शक होण्यासाठी बोर्डाने काही बदल केले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आता अनुदानित शाळांवरील शिक्षक बहिस्थ: परीक्षक म्हणून खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवर जातील. स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवरील शिक्षक खासगी अनुदानित शाळांमधील प्रात्यक्षिक परीक्षा घेतील. लेखी परीक्षेत प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा असेल. तेथील पर्यवेक्षकाचे मोबाईल झूम द्वारे जोडले जातील. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या संनियंत्रण कक्षातून वरिष्ठ अधिकारी परीक्षेवर लक्ष ठेवतील.


पुणे बोर्डाचे विभागीय अध्यक्ष औदुंबर उकीरडे यांनी मागील आठवड्यात उत्तर नगर जिल्ह्यातील दहावी आणि बारावीच्या शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची लोणी येथे तर दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये दक्षिणेतील शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्याध्यपक व प्राचार्य यांनी स्वत: हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, यावेळी अनेकांनी आपले प्रतिनिधी या बैठकीला पाठवले होते.