10th Board Exam : उद्यापासून इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा; जिल्ह्यात ६८९११ परीक्षार्थी

10th Board Exam : उद्यापासून इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा; जिल्ह्यात ६८९११ परीक्षार्थी

0
10th Board Exam : उद्यापासून इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा; जिल्ह्यात ६८९११ परीक्षार्थी
10th Board Exam : उद्यापासून इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा; जिल्ह्यात ६८९११ परीक्षार्थी

10th Board Exam : नगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची (SSC Board) (इयत्ता १०वी)ची परीक्षा (10th Board Exam) उद्या (ता. २१) पासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात ६८ हजार ९११ परीक्षार्थी आहेत. परीक्षा कालावधीत अनावश्यक लोकांनी परीक्षा केंद्र (Examination Center) परिसरात फिरकू नये. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर शांतता ठेवावी अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेसाठी आवाहन केले आहे.

नक्की वाचा : जूनपासून देशातील शिक्षण पद्धतीत ‘हे’ होणार बदल

१०वी परीक्षाही कॉपी मुक्त व्हावी, यासाठी प्रशासनाची तयारी

जिल्ह्यात इयत्ता १२ वी प्रमाणेच इयत्ता १०वीची परीक्षाही कॉपी मुक्त वातावरणात व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. जिल्ह्यात १८४ परीक्षा केंद्रे आहेत. त्यातील ३० परीक्षा केंद्रे  संवेदनशील असल्याचे घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात २१ परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कॉपीचे प्रकार थांबवण्यासाठी ७ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच ३० परीक्षा केंद्रांतील पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्यात आली आहे.

अवश्य वाचा : जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी

जिल्हाधिकारी कार्यालयातून वेबकास्टिंग मॉनिटरींग (10th Board Exam)

कॉपीमुक्त अभियानासाठी दक्षता समिती तयार करण्यात आली आहे. कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयातून विशेष पथकाकडून वेबकास्टिंग मॉनिटरींग करण्यात येणार आहे. सामूहिक कॉपीचे गैरप्रकार आढळून आल्यास सहभागी परीक्षा केंद्राची व शाळेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेरे लक्ष ठेवणार आहेत. उपद्रवी परीक्षा केंद्रांवर पोलिसांचे गस्ती पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच या परीक्षा केंद्राच्या परिसरात व्हिडिओ शुटिंगही केले जाईल. राज्य परीक्षा मंडळाकडून ७ भरारी पथके नियुक्त केली आहेत. या शिवाय जिल्हाधिकारी स्तरावरून विशेष भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रत्येकी दोन बैठे पथकांकडून निगराणी करण्यात आली आहे. परीक्षा मंडळाकडून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींची सरमिसळ करण्यात आली आहे.