10th result : नगर : महाराष्ट्र (Maharashtra) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल (10th result) आज जाहीर केला आहे. नगर जिल्ह्याचा दहावीचा यंदाचा एकूण निकाल (Result) ९४.५६ टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये पारनेर, जामखेड, श्रीगोंदे आणि अकोले तालुक्यांनी बाजी मारली आहे. निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल
सर्वच तालुक्यांमध्ये मुलींनी बाजी मारली
मुलींचा निकाल ९६.६१ टक्के तर मुलांचा निकाल ९२.९१ टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच तालुक्यांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातून मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी ६९ हजार २६५ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ३८ हजार २९४ मुले, तर ३० हजार ९७१ मुली होत्या. यापैकी ६५ हजार ५०२ विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये ३५ हजार ५८० मुले, तर २९ हजार ९२२ मुली आहेत. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९४.४८ टक्के लागला होता. यामध्ये देखील मुलींनीच बाजी मारली होती. यंदा श्रीगोंदे तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला होता.
अवश्य वाचा : कोलकाताची तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या जेतेपदावर मोहोर; हैदराबादला नमवले
तालुकानिहाय निकाल (10th result)
पारनेर – ९५.८९
जामखेड – ९५.९६
श्रीगोंदे – ९६.२३
अकोले – ९५.६७
कर्जत – ९५.७४
कोपरगाव – ९३.१७
नगर – ९४.६८
नेवासे – ९५.१८
पाथर्डी – ९५.०९
राहाता – ९३.३०
राहुरी – ९२.२१
संगमनेर – ९४.९३
शेवगाव – ९५.४५
श्रीरामपूर – ९१.४४