11 Child Deaths : ११ बालकांच्या मृत्यूमुळे कफ सिरपच्या वापराबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ॲडव्हायजरी केली जारी

11 Child Deaths

0
11 Child Deaths
11 Child Deaths

11 Child Deaths : नगर : बंदी घातलेले कफ सिरप (Cough Syrup) प्यायल्याने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू (11 Child Deaths) झाला आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) एक ॲडवायझरी जारी केली आहे. सरकारने असे म्हटले आहे की दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला आणि कफ सिरप देऊ नये. आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) बालरोग रुग्णांमध्ये कफ सिरपच्या वापराबद्दल एक सल्ला जारी केला आहे.

अवश्य वाचा: अकोले तालुक्याचे ‘अगस्तिनगर’ नामांतर करा : सदगीर

दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध दिले जाऊ नये

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या संबंधित मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत. यादरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांच्या प्रकरणांमध्ये कफ सिरपच्या वापराबद्दल ॲडव्हायजरी जारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध दिले जाऊ नये. इतकेच नाही तर पाच वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना देखील डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि योग्य कालावधीसाठीच याचा वापर केला गेला पाहिजे.

नक्की वाचा : महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

सरकारने म्हटले आहे की, (11 Child Deaths)

“साधारणपणे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी त्यांची शिफारस केली जात नाही. दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला आणि सर्दीची औषधे देऊ नयेत. कोणत्याही औषधाचा वापर काळजीपूर्वक क्लिनिकल मूल्यांकन, बारकाईने देखरेख आणि योग्य डोसचे काटेकोर पालन, किमान प्रभावी कालावधी आणि अनेक औषधांच्या मिश्रण टाळण्यावर आधारित असावा.” याव्यतिरिक्त, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे पालन करण्याची गरज आहे याबद्दल जनतेला जागरूक केले जाऊ शकते.”

आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की खोकला आणि सर्दीच्या प्रकरणात आधी आराम, पुरेसे पाणी आणि इतर सहायक उपाय करणे गरजेचे आहे. सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांनी फक्त गुणवत्तापूर्ण औषधेच द्यावीत आणि राज्य आरोग्य विभागाने हे सर्व सरकारी आणि खाजगी आरोग्य केंद्रात लागू करावे. भारत सरकारने कफ सिरप आणि सर्दी-खोकल्याच्या औषधांचा सुरक्षित आणि तर्कसंगत वापर व्हावा यासाठी नवी ॲडव्हायजरी जारी केली आहे.