12th Exam : कर्जत : बारावीची परीक्षा (12th Exam) ही जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असून प्रत्येकाने त्यासाठी धैर्याने व शांतचित्ताने सामोरे जावे. परीक्षेचा पेपर सोडवताना वेळेचे नियोजन, त्यासाठी कोणते तंत्र वापरावे यासह उत्तरपत्रिकेत मुद्द्यांची मांडणी कशाप्रकारे करावी, याबाबतचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. संजय नगरकर (Sanjay Nagarkar) यांनी केले. या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सकारात्मक दृष्टिकोन ठेवत परीक्षेस सामोरे जावे. परीक्षेत गैरमार्ग केल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव नगरकर यांनी करून दिली. ते कॉपीमुक्त अभियान अंतर्गत जनजागृती सप्ताह प्रसंगी बोलत होते. यावेळी बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त (Copy-Free) अभियानाची शपथ घेतली.
नक्की वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
कॉपीमुक्त अभियानाची शपथ
दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य विभागातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी शारदाबाई पवार सभागृह येथे कॉपीमुक्त अभियान अंतर्गत जनजागृती सप्ताहनिमित्त कॉपीमुक्त अभियानाची शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरवापर करणार नाही याबाबतची कॉपीमुक्त अभियानाची शपथ दिली.
अवश्य वाचा : अन्यथा आकाशवाणी केंद्राला टाळे ठोकू : अभिजीत खोसे
उत्तरपत्रिकेवरती असणाऱ्या सूचनांचे करून दाखवले वाचन (12th Exam)
प्रा. सुनील देशमुख यांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट व उत्तरपत्रिकेच्या वरती असणाऱ्या सूचनांचे वाचन करून दाखवले. तसेच सदर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात वैष्णवी घोडके, सिद्धी मांढरे आणि भाग्यश्री घालमे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेश दळवी, सूत्रसंचालन प्रा. किरण भोसले यांनी केले तर आभार प्रा. वसंतराव आरडे यांनी मानले.