12th Exam : उद्यापासून १२ वीची परीक्षा; जिल्ह्यात ६४ हजार परीक्षार्थी

12th Exam : उद्यापासून १२ वीची परीक्षा; जिल्ह्यात ६४ हजार परीक्षार्थी

0
12th Exam : उद्यापासून १२ वीची परीक्षा; जिल्ह्यात ६४ हजार परीक्षार्थी
12th Exam : उद्यापासून १२ वीची परीक्षा; जिल्ह्यात ६४ हजार परीक्षार्थी

12th Exam : नगर : राज्य परीक्षा मंडळाकडून उच्च माध्यमिक शालांत (HSC) परीक्षा (इयत्ता १२ वी) (12th Exam) उद्या (मंगळवार) पासून सुरू होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून १०९ परीक्षा केंद्रांतून ६३ हजार ६५८ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

नक्की वाचा : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र

जिल्ह्यात २१ परिरक्षक, ७ भरारी पथके

अहिल्यानगर जिल्हा कॉपी मुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात २१ परिक्षक, ७ भरारी पथके तयार करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील १०९ परीक्षा केंद्रांपैकी ४० केंद्रांना संवेदनशिल परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. ४६ परीक्षा केंद्रांतील पर्यवेक्षक अदलाबदल करण्यात आलेले आहेत. या शिवाय गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरे, व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. तसेच पोलीस गस्ती पथक व बैठे पथकही तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

अवश्य वाचा : शेवगाव येथील मंदिर सेवेकऱ्याच्या हत्येची उकल

कॉपीमुक्त अभियानासाठी दक्षता समितीची स्थापना (12th Exam)

कॉपीमुक्त अभियानासाठी दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यात कॉपी सारखे गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करणे, गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता रद्द करणे आदी कारवाई करणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रत्येकी दोन बैठे पथकांकडून निगराणी ठेवण्यात येणार आहे.