12th Result : नगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख आज जाहीर करण्यात आली. त्यानुसार उद्या (ता. २१) दुपारी एक वाजता बारावीचा निकाल (12th Result) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळांवर (Websites) पाहता येणार आहे.
नक्की वाचा: दरोड्याचा प्लॅन फसला; तिघे जेरबंद
निकालाची उत्सुकता शिगेला
बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता शिगेला लागली असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची तारीख व वेळ जाहीर केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
हे देखील वाचा: कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत हल्ला; हार घालण्याच्या बहाण्याने कानशिलात लगावली
या संकेतस्थळांवर पाहता येणार
बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org, www.mahahsscboard.in, https://results.digilocker.gov.in, http://results.targetpublications.org या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.