12th Result : बारावीच्या यशाचा दर सुधारला; नगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के

12th Result

0
12th Result
12th Result

12th Result : नगर : राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत (12th Result) यंदाही मुलींनीच बाजी मारली. परीक्षेस (Exam) बसलेल्या बहुतांश मुली उत्तीर्ण झाल्या. पुणे विभागात नगरचा निकाल (Result) ९३.१४ टक्के लागला. मागील वर्षीपेक्षा दीड टक्के निकालात वाढ झाली आहे.

12th Result
12th Result

हे देखील वाचा: ‘६ जूनपर्यंत आरक्षण द्यावं,अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल’- मनोज जरांगे

नगर तिसऱ्या स्थानी

मंडळातर्फे बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता ॲानलाइन जाहीर करण्यात आला. यंदा बारावीची परीक्षा ३५ हजार ३५५ मुले व २६ हजार ६११ मुली, अशा एकूण ६१ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातून ३२ हजार २०२ मुले (९१.०८ टक्के) व २५ हजार ६७५ मुली (९६.४८ टक्के) असे एकूण ५७ हजार ८७७ विद्यार्थी (९३.४० टक्के) उत्तीर्ण झाले. यंदा पुणे विभागात नगर तिसऱ्या स्थानी फेकले गेले आहे. पुणे विभाग ९५.१९ टक्क्यांसह पहिल्या, तर सोलापूर विभाग ९३.८८ टक्क्यांनिशी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here