Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!राज्यातील नऊ लाख बहिणींचे १५०० रुपये होणार बंद 

0
Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!राज्यातील नऊ लाख बहिणींचे १५०० रुपये होणार बंद 
Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!राज्यातील नऊ लाख बहिणींचे १५०० रुपये होणार बंद 

नगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून (Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana) कमी केलेल्या महिलांची संख्या आता ९ लाख (9 lakh) होणार आहे. यापूर्वी ५ लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती.आता नव्याने ४ लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे राज्य सरकारच्या ९४५ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे.

नक्की वाचा : किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जोजवला शिवरायांचा पाळणा

नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या ५ लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त ५०० रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून १००० रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे. वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत. त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत, त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.

अवश्य वाचा : शिवजयंती निमित्त नरेंद्र मोदी यांची मराठीतून पोस्ट 

महिलांच्या अर्जांची फेरतपासणी (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेतील सुमारे १६.५ लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आले होते.मात्र यात त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे. अशा लाभार्थ्यांची जिल्हास्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येणार आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल, त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवे निकष (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारकडून नवे निकष लागू केले जातील. पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा,यासाठी सरकारकडून आता कठोर पाऊले उचलली जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करुन हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. दरवर्षी १ जून ते १जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागणार आहे. ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे, त्यांना या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे.

लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे की नाही,हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तीकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here