15th January Holiday: १५ जानेवारीला महाराष्ट्रात ‘पगारी सुट्टी’अनिवार्य; सुट्टी न दिल्यास होणार ‘ही’ कारवाई

0
15th January Holiday: १५ जानेवारीला महाराष्ट्रात 'पगारी सुट्टी'अनिवार्य; सुट्टी न दिल्यास होणार 'ही' कारवाई
15th January Holiday: १५ जानेवारीला महाराष्ट्रात 'पगारी सुट्टी'अनिवार्य; सुट्टी न दिल्यास होणार 'ही' कारवाई

15th January Holiday : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलाय. येत्या १५ जानेवारीला (15th January) होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व नोकरदार कर्मचाऱ्यांना ‘भरपगारी सुट्टी’ (Paid leave) देण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. या निर्णयामुळे नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला दिलासा मिळाला आहे.

नक्की वाचा: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?
अहिल्यानगरसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या सर्व महानगरपालिका क्षेत्रांतील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना हा नियम लागू राहणार आहे, मग ते सरकारी कर्मचारी असो, निमसरकारी किंवा खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असोत.या सगळ्यांसाठी हा नियम असेल.

१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी ही भरपगारी सुट्टी कर्मचाऱ्यांना लागू असेल. प्रशासनाकडून आधीच यासंदर्भातील आदेश जाहीर करण्यात आले आहेत, जेणेकरून आस्थापनांना नियोजन करता येईल. मात्र सुट्टी न देणाऱ्या आस्थापनांवर यावेळी मात्र कडक कारवाई करण्याचा इशारा उद्योग आणि कामगार विभागाने दिला आहे.

अवश्य वाचा: राज्यात कोणाची कोणासोबत लढत;कुठे युती कुठे आघाडी? जाणून घ्या…     

कोणी घेतलाय ‘हा’ निर्णय (15th January Holiday)

राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. या आदेशाचा लाभ १८ वर्षांवरील नोंदणीकृत मतदार असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना मिळणार आहे.

हा निर्णय नेमका का घेण्यात आलाय ? (15th January Holiday)

लोकशाही व्यवस्थेत मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ मधील परिच्छेद १३५ (बी) नुसार, मतदानाच्या दिवशी मतदारांना आवश्यक सवलत देणे बंधनकारक आहे. मात्र, मागील काही निवडणुकांमध्ये अनेक खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी न दिल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. यामुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता निर्माण होत असल्याने, यावेळी सरकारने कठोर भूमिका घेतलीय.

सर्व आस्थापना मालकांना ही सुट्टी देणे सक्तीचे आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला सुट्टी किंवा सवलत मिळाली नाही आणि त्याची तक्रार आली, तर संबंधित कंपनी किंवा मालकावर कायदेशीर कारवाई होईल,असा सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे. अशा प्रकरणांमध्ये दंड किंवा इतर शिक्षा होऊ शकते.यामुळे कंपन्यांना हा नियम पाळणे बंधनकारक राहील.

सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयांसह खासगी कंपन्या,आयटी पार्क्स, औद्योगिक आस्थापना, व्यापारी दुकाने, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स आणि इतर व्यावसायिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असेल. जे कर्मचारी सध्या कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत आहेत, पण त्यांचे नाव संबंधित मतदार यादीत आहे, त्यांनाही ही सुट्टी देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेत.

ज्या ठिकाणी कामाच्या स्वरूपामुळे पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नाही,अशा आस्थापनांनी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे अनिवार्य करण्यात आले आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानात प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे सहभागी व्हावे, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे १५ जानेवारीला सर्व आस्थापनांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.