Trending News:ऐकावं ते नवलच!नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ

0
Trending News:ऐकावं ते नवलच!नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ
Trending News:ऐकावं ते नवलच!नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ

Trending News : सोशल मीडियाच्या जगात कधी काय होईल हे सांगता येत नाही,असाच एक अजिब प्रकार उत्तरप्रदेशमध्ये (Uttarpradesh)घडला आहे. नवऱ्याच्या कायमच्या व्यसनाधीनतेला (Addicted husband) कंटाळलेल्या दोन महिलांनी घरातून निघून जाऊन एकमेकींशी लग्न केल्याचा (2 women marry each other) अजब प्रकार उत्तर प्रदेशच्या गोरखपूर (Gorakhpur) येथे घडला. कविता आणि गुंज अशी दोघींची नावे आहे.

देवरिया येथील छोटी काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिव मंदिरात दोघींनीही एकमेकींशी लग्नगाठ बांधली. यावेळी गुंजने नवऱ्याची भूमिका साकारत कविताला सिंदूर लावला. दोघींनी एकमेकांना हार घालून सात फेरे घेऊन विधीवत लग्न केल्याची घटना घडली आहे.

नक्की वाचा : अभिमानास्पद! प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर बीडची कन्या करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व

कविता आणि गुंज या दोनही महिला त्यांच्या नवऱ्याच्या व्यसनाधीनता आणि सततच्या छळाला कंटाळल्या होत्या.सहा वर्षांपूर्वी दोघींची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी घर सोडून एकमेकींबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. दोघींनाही पतीकडून कौटुंबिक अत्याचाराचा सामना करावा लागला,अशी माहिती समोर आली आहे. शिव मंदिराचे पुजारी उमाशंकर पांडे यांनी सांगितले की,दोन्ही महिलांनी लग्नासाठीचे साहित्य स्वतःबरोबर आणले होते. त्यांनी विधी पूर्ण केल्या आणि त्या दोघी निघून गेल्या.

नवऱ्याच्या रोजच्या अत्याचाराला आम्ही कंटाळलो होतो. दोघींपैकी एकीला चार मुले आहेत. तिने अत्याचाराला कंटाळून माहेर गाठले होते. तर दुसरी महिलाही नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळली होती. तिच्यावर सतत व्याभिचाराचे आरोप नवरा करत होता,असे तिने सांगितले.

अवश्य वाचा : लालपरीचा प्रवास महागला!आजपासून १५% भाडेवाढ

गुंजने माध्यमांशी बोलताना सांगितले की,आम्ही नवऱ्याच्या व्यसन आणि छळाला कंटाळलो होतो.यापुढे आम्हाला आमचे आयुष्य शांतपणे आणि आनंदात घालवायचे आहे.आम्ही आता गोरखपूर येथे एकत्र राहणार असून जगण्यासाठी इथेच काम करणार आहोत. गोरखपूरमध्ये आमचे घर नाही,पण भाड्याने राहून आम्ही पुढचे आयुष्य व्यतित करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here