Guillain Barre Syndrome:पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण;महापालिका अलर्ट मोडवर

0
Guillain Barre Syndrome:पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण;महापालिका अलर्ट मोडवर
Guillain Barre Syndrome:

नगर : मागील काही दिवसांपासून पुण्यात (Pune) गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या दुर्मिळ व्याधीचे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे.आता पुण्यात या दुर्मिळ व्याधीचे २२ संशयित रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे. पुणे महानगर पालिकेकडे अशा प्रकारचे २२ संशयित रुग्ण (22 Patients) असल्याची माहिती देण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय(Dinanath Mangeshkar Hospital) पूना हॉस्पिटलमध्ये (Puna Hospital) या आजाराशी संबंधित लक्षणं आढळल्याची तक्रार असणारे रुग्ण दाखल झाल्यानंतर ही माहिती महानगर पालिकेला कळवण्यात आली.  

नक्की वाचा : अमेरिकेत आता तृतीयपंथींना मान्यता नाही,डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

गुइलेन बॅरी सिंड्रोममुळे पुणे महापालिका अलर्ट मोडवर (Guillain Barre Syndrome)

आय सी एम आर एन आय व्हीला तपासणीसाठी नमुने पाठवले आहेत. गुइलेन बॅरी सिंड्रोम विरोधात महापालिका अलर्ट मोडमध्ये आली आहे. एनआयव्हीचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, त्या भागात टीम दाखल करणार आहे. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो एक लाखांमध्ये एका व्यक्तीला आढळतो अशी माहिती आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी अधिक माहिती दिली आहे.

अवश्य वाचा : कलाविश्वावर शोककळा! अभिनेते योगेश महाजन यांचं हृदयविकाराने निधन

डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, पुण्यातील तीन ते चार हॉस्पिटलमध्ये २२ संशयित रुग्ण आहेत, सहा संशयित रुग्ण पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत आहेत. या सगळ्यांचे सॅम्पल्स एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहे. हा आजार एका कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि या आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं. १२ ते ३० वयोगटाच्या दरम्यान व्यक्तींना हा आजार होतो. हा आजार धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचे काही कारण नाही. आज या आजारासंदर्भात तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. याबाबत सर्व एक्सपर्टची कमिटी तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर उपाययोजना काढणार आहोत. सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचं कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही.नेहमीची जी ट्रीटमेंट असते, ती ट्रीटमेंट दिली जाते. लवकरात लवकर बरं होणारा हा आजार आहेत. लहान मुलांना दिलेल्या लसीमुळे देखील हा आजार होऊ शकतो. रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तरीही हा आजार होऊ शकतो, त्यामुळे या आजारामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, असंही डॉ. नीना बोराडे यांनी सांगितलं आहे.

गुइलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे काय ? (Guillain Barre Syndrome)

1)  गुइलेन बॅरी सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार, आजारामुळे स्नायू कमकुवत होतात.
2) स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात, संवेदना कमी होतात.
3) चेहरा, डोळा, छाती, शरिरातील स्नायूंवर परिणाम, तात्पुरता अर्धांगवायू, श्वसनाचा त्रास
4) हाताची बोटं, पाय यांत वेदना, चालताना समस्या, चिडचिड, चेहऱ्यावर कमजोरी ही प्रमुख लक्षणं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here