Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र

0
Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र
Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र

नगर : विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana) योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती एक्सवर दिली आहे. या नव्या निकषांनुसार या योजनेतून पाच लाख महिला आता अपात्र (Five lakh women are ineligible) ठरणार आहेत.

नक्की वाचा : आता गृहकर्ज,वाहनकर्ज स्वस्त होणार;पाच वर्षानंतर आरबीआयकडून व्याजदरात कपात  

‘या’ महिला अपात्र ठरणार (Ladki Bahin Yojana)


मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे

अवश्य वाचा : ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक आला समोर   


अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here