8 Don 75 : ‘8 दोन 75’, फक्त इच्छाशक्ती हवी !” चित्रपटाचा टीझर प्रदर्शित 

'8 दोन 75' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संस्कृती बालगुडे अभिनीत या सिनेमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

0
'8 दोन 75' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

नगर : मागील काही दिवसांपासून ‘8 दोन 75’ (8 Don 75) हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे.अनेक पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे. आता ‘8 दोन 75’ या सिनेमाचा टीझर (teaser out) आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) अभिनीत या सिनेमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नक्की वाचा : मुग्धा-प्रथमेशला लागली हळद;फोटो व्हायरल

अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे,राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी हे कलाकार ‘8 दोन 75’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी वैभव जोशी यांनी गीते लिहिली असूनअवधून गुप्ते यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. सुश्रुत भागवत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

अवश्य वाचा : ‘भिंती बोलतात तेव्हा इतिहास ऐकू येतो’ संगीत नाटकाचे आयोजन

देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा हा सिनेमा आहे. फ्रान्स,सर्बिया, इटली यनासह इतर आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्ससह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये 90 पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने  केली आहे. उत्तम विषय आणि कलाकारांचा दमदार अभिनय ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. हा चित्रपट प्रदर्शित 19 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here