90 Hours Work Week : लोकांनी आठवड्यातून 90 तास काम करावे, रविवारीही काम करावे एल अँड टी कंपनीच्या अध्यक्षांचे विधान

90 Hours Work Week

0
90 Hours Work Week : लोकांनी आठवड्यातून 90 तास काम करावे, रविवारीही काम करावे एल अँड टी कंपनी चेअरमन यांचे विधान
90 Hours Work Week : लोकांनी आठवड्यातून 90 तास काम करावे, रविवारीही काम करावे एल अँड टी कंपनी चेअरमन यांचे विधान

90 Hours Work Week : नगर : एल अँड टीचे (L&T) अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम (S N Subrahmanyam) हे आपल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. एल अँड टी कंपनी अब्जावधी डॉलर्सची आहे. तरीही तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना शनिवारीही काम करायला लावता, असा प्रश्न लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या अध्यक्षांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी उत्तर दिले. रविवारी मी माझ्या लोकांना कामावर आणू शकत नाही याचे मला वाईट वाटते. माझ्या कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम केले तर मला आनंद होईल. कारण मी रविवारीही काम करतो. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे (90 Hours Work Week), असेही ते पुढे म्हणाले.

नक्की वाचा : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार,नितीन गडकरींची घोषणा

केलेले वक्तव्य देशभरात आलंय चर्चेत

एका कार्यक्रमादरम्यान सुब्रमण्यन यांना लार्सन अँड टुब्रो कंपनीची अब्जावधींची उलाढाल असतानाही त्यांच्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना शनिवारीसुद्धा कामावर यावं लागतं, यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेबाबत मार्गदर्शन केले आहे. यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य देशभरात चर्चेत आलंय. कर्मचाऱ्यांनी रविवारी घरी वेळ घालवू नये. घरी बसून काय करणार? कर्मचारी किती वेळ त्याच्या बायकोकडे पाहत राहील आणि किती वेळ त्याची बायको त्याच्याकडे पाहत राहील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकांनी रविवारीही ऑफिसमध्ये काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

चेअरमनच्या यांच्या वक्तव्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला (90 Hours Work Week)

यानंतर माध्यमांवर अनेक जणांनी चेअरमनच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. यानंतर एलअँडटीकडूनही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिथं राष्ट्रनिर्माणावर आपला विश्वास असून, हीच आपली प्राथमिकता आहे असं म्हणत हा एकत्र येऊन काम करण्याचा आणि प्रगतीच्या दिशेनं पावलं उचलण्याचा काळ असल्याचंही कंपनीच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.