Radhakrishna Vikhe Patil : नगर : सुप्याच्या एमआयडीसीत (MIDC) खंडणी बहाद्दर गोळा झाले आहेत. त्यांचा वेगळा विचार करावा लागेल, अशी टीका नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली. मोहटादेवी (ता. पाथर्डी) येथे काल (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विखे पाटील कुटुंबावर जोरदार टीका केली होती. या टीके संदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते बोलत होते.
हे देखील वाचा : सुजय विखे यांना आम्ही बहुमताने निवडून आणू; आमदार राम शिंदेंचा निर्धार
लंकेंनी विखेंवर केली होती टीका
नीलेश लंकेंनी मोहाटदेवी येथे स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या प्रारंभ कार्यक्रमाच्या भाषणात विखे पाटील पिता- पुत्रावर टीका केली होती. त्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिउत्तर दिले. ते म्हटले की, टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेच्या न्यायलायात जावून आपण मत मागतो आणि डॉ सुजय विखे नक्कीच निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा: लोकसभा निवडणुकीत माझा फोटो,नाव कुणीही वापरू नयेत-मनोज जरांगे
विखेंची लंकेनवर टीका (Radhakrishna Vikhe Patil)
नीलेश लंके जोपर्यंत मित्रपक्षात सहकारी होते, तोपर्यंत त्यांना मोदी, शहा आणि राजनाथ सिंग यांच्या जिल्हा दौऱ्याबद्दल आक्षेप नव्हता. आता ते विरोधीपक्षाची भूमिका बजावत आहेत. लंके हे विनोद करू शकतात, याच आश्चर्य वाटत आहे. सुपा एमआयडीसीमध्ये खंडणी बहाद्दर गोळा झाले आहेत. त्यांचा वेगळा विचार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.



