नगर : गुजरातमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुजरातच्या (Gujrat) बोरसदमध्ये महिसागर नदीवर असलेल्या पुलाचे अचानक दोन तुकडे (Bridge Collapse) झालेत. त्यामुळे अनेक वाहने नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू (Three People Died) झाला असून या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये अक्षरशः पुलावरून वाहने नदीत कोसळताना दिसत आहेत.
नक्की वाचा : ‘मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार’-सुप्रिया सुळे
मिळालेल्या माहितीनुसार,आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. आनंद आणि बडोदा मार्गावरील महिसागर नदीवर असलेला हा गंभीरा पूल कोसळला. पुलावरून वाहनांची ये-जा सुरू असतानाच पुलाचे दोन तुकडे झालेत. परिणामी, अनेक वाहने नदीत कोसळली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन ट्रक आणि दोन व्हॅनसह एकूण चार वाहने नदीत कोसळली आहे. आतापर्यंत तीन मृतदेह हाती लागले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा : देशातील कामगार संघटनेची भारत बंदची हाक;२५ कोटी कामगार रस्त्यावर उतरणार
घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु (Bridge Collapse In Gujarat)
पूल कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, बचाव पथक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत चार जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. नदीत पडलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि वाहने बाहेर काढण्यासाठी सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती पडारा पोलिस निरीक्षक विजय चरण यांनी दिली आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता (Bridge Collapse In Gujarat)
या दुर्घटनेमुळे मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली असून, मदतकार्याला गती देण्यासाठी वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप नदीत नेमकी किती वाहने पडली आहेत आणि किती लोक बेपत्ता आहेत, याबाबत अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.