नगर : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आलिया भट्टची (Alia Bhatt) फसवणूक करणाऱ्या तिच्या पर्सनल असिस्टंटला (Alia Bhatt Personal Assistant) अटक करण्यात आली आहे. वेदिका प्रकाश शेट्टी असं तिचं नाव आहे. फेरफार करुन आलिया भट्टला तब्बल ७७ लाखांचा गंडा तिने घातला आहे. अटक करण्यात आलेली वेदिका ही काही दिवसांपूर्वी आलियाची पर्सनल असिस्टंट म्हणून काम पाहत होती. तिने आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यांमधून तब्बल ७७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी याप्रकरणी वेदीकावर गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. आलिया भट्ट आणि तिच्या टीमकडून मात्र याबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.
नक्की वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू
खोटी बिले बनवत वेदिकाकडून आलियाची फसवणूक (Alia Bhatt PA Arrested)
वेदिका शेट्टीला आलिया भट्टच्या प्रॉडक्शन हाऊस Eternal Sunshine Productions Pvt Ltd आणि आलियाच्या वैयक्तिक खात्यातून पैसे काढल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टीनं आपल्या पदाचा आणि कामाचा गैरफायदा घेऊन फसवणूक केली. आलियाच्या खात्यातून आणि कंपनीच्या पैशातून अनेक खोटी बिले बनवली. खोटी बिलं तयार करुन तिनं रक्कम काढली. काही महिन्यांपासून ही रक्कम हळूहळू काढली जात होती. वेदिकाकडून होत असलेल्या व्यवहारांवर कंपनी आणि आलियाची टीम लक्ष ठेवून होती. अखेर त्यांनी तिची चौकशी करुन हा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.
अवश्य वाचा : ‘मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार’-सुप्रिया सुळे
आलियाच्या खोट्या सह्या घेतल्याचा आरोप (Alia Bhatt PA Arrested)
आलियाची आई सोनी राजदान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी हा गुन्हा दाखल केला होता. सुमारे ५ महिन्यांनंतर आरोपीला बंगळुरू येथून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. वेदिकावर आलियाची बनावट सही करून दोन वर्षांत ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.