Crime : कोयत्याने मारहाण; चौघे जखमी, १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Crime : कोयत्याने मारहाण; चौघे जखमी, १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल

0
Crime : कोयत्याने मारहाण; चौघे जखमी, १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल
Crime : कोयत्याने मारहाण; चौघे जखमी, १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Crime : नगर : रस्त्यावरून ये-जा केल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबातील चार सदस्यांवर लोखंडी गज, कोयत्याने मारहाण (Beating) करून जखमी केल्याची घटना बाबुर्डी घुमट (ता. अहिल्यानगर) येथे घडली. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध तालुका पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल कारण्याता आला आहे.

नक्की वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू

जखमींची नावे

मारूती कल्लपा मोरे, अनिल लक्ष्मण मोरे, संजय कल्लुपा मोरे, भैरू लक्ष्मण मोरे (सर्व रा. बाबुर्डी घुमट) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी मारूती मोरे यांच्या जबाबावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अवश्य वाचा : पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश

गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे (Crime)

जयश्री अनिल मोरे, यल्लमा संजय मोरे (दोघे रा. वाळवणे, ता. पारनेर), पल्लवी विशाल गायकवाड, गंगुबाई आण्णा गायकवाड (दोघी रा. बाबुर्डी घुमट), विशाल गायकवाड याची चुलत सासु (नाव माहिती नाही, रा. वाळवणे), विष्णू आण्णा गायकवाड (रा. बाबुर्डी घुमट), आदित्य राजू मोरे, रोहन अनिल मोरे, किसन अल्लपा मोरे (सर्व रा. वाळवणे), अजय बारकु गायकवाड (रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे), विशाल आण्णा गायकवाड, आण्णा धोंडिबा गायकवाड (रा. बाबुर्डी घुमट) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.