Fraud : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील एका कला व कनिष्ठ महाविद्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्ती (Scholarship) घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे (ZP) शिक्षणाधिकारी बाळासाहेब दादाबा बुगे (वय ५३, रा. प्रणव संकुल, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून दोन संशयितांविरोधात फसवणुकीचा (Fraud) गुन्हा अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश
यांच्याविरूध्द गुन्हा दाखल
एम. डी. अनसारूल व नुर हुसेन (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाहीत) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी सन २०२१-२२ मध्ये केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सात बनावट विद्यार्थ्यांची नावे वापरून, त्यांचे बनावट शैक्षणिक दाखले सादर करून फॉर्म भरले.
नक्की वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू
३८ हजार ९०० रूपयांची शासनाची फसवणूक (Fraud)
ही नावे संबंधित महाविद्यालयात दाखल असल्याचे भासवून शासनाकडून एकूण ३८ हजार ९०० रूपयांची शिष्यवृत्ती रक्कम मिळवण्यात आली. ही रक्कम खात्यावर वर्ग करून शासनाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बुगे यांनी सोमवारी (ता.७) रोजी रात्री अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक व बनावट कागदपत्र तयार करणे व वापरणे यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.