Crime : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार (Gambling) अड्ड्यावर विशेष पोलीस (Police) पथकाने छापा टाकून १२ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल सात लाख ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू
यांच्या विराेधात गुन्हा दाखल
अमित बाळासाहेब चिंतामणी (वय ३५ रा.सर्जेपुरा, अहिल्यानगर), फय्याज अख्तर शेख (वय २५, रा.तख्ती दरवाजा, अहिल्यानगर), राजू प्रकाश काळे (वय ३४, रा. कौडगाव, अहिल्यानगर), युवराज भाऊसाहेब करंजुले (वय ४५, रा. फकीरवाडा, अहिल्यानगर), नासीर गुलाब खान (वय ५८, रा. मुकुंदनगर), संजय नामदेव शेलार (वय ५६, रा. समर्थ नगर, बुरुडगाव), समीर आयुब शेख (वय ४४, रा. पारश्याखुंट), सईद ताहेर बेग (वय ४३, रा. काटवणं खंडोबा), अक्षय पवार, शिवा पाचारणे व इतर दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश
विशेष पोलीस पथकाची (Crime)
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विशेष पथकाचे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार अरणगाव परिसरात जुगार अड्डा सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.