Fraud : एजन्सी देण्याचे आमिष दाखवत तरूणीची ३० लाखांची फसवणूक

Fraud : एजन्सी देण्याचे आमिष दाखवत तरूणीची ३० लाखांची फसवणूक

0
Fraud : एजन्सी देण्याचे आमिष दाखवत तरूणीची ३० लाखांची फसवणूक
Fraud : एजन्सी देण्याचे आमिष दाखवत तरूणीची ३० लाखांची फसवणूक

Fraud : नगर : विमान तिकीट बुकिंग (Airline Ticket Booking) एजन्सीच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या कमिशनचे आमिष दाखवून अहिल्यानगर मधील तरुण व्यावसायिकेची ३० लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मुंबईच्या (Mumbai) दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल (Crime filed) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत विविध पदांसाठी भरती

फसवणुकीचा गुन्हा दाखल

राहुल जगताप व एंजल जगताप यांच्या विरोधात फसवणुकीचा तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आचल अग्रवाल यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. फिर्यादी यांचे वडील अहिल्यानगर एमआयडीसी येथे एक कंपनी चालवतात. ऑगस्ट २०२४ मध्ये कुटुंबीयांसाठी विमान तिकिटांची व्यवस्था करताना त्यांची ओळख अनुज अनिल मित्तल याच्याशी झाली. त्याचवेळी मित्तलने त्यांना रिजॉईस इव्हेंट ऑर्गनायजेशन या कंपनीबाबत माहिती दिली, जी फ्लाईट व हॉटेल बुकिंगसाठी एजंट शोधत होती. यानुसार मित्तलने २७ ऑगस्ट २०२४ रोजी अहिल्यानगरमधील अक्की बर्गर, प्रोफेसर चौक येथे अग्रवालची भेट राहुल दर्शन जगताप आणि त्याची पत्नी एंजल राहुल जगताप (रा. नवी मुंबई) यांच्याशी घालून दिली. त्यांनी अग्रवाल याला कंपनीची एजन्सी देण्याचा प्रस्ताव ठेवला. तुम्ही गुंतवणूक केल्यास १५ टक्के कमिशन मिळेल, असे आमिष त्यांना दाखवले. मात्र त्यासाठी सुरुवातीस ३० लाखांची गुंतवणूक करावी लागेल असे सांगण्यात आले.

अवश्य वाचा : बनावट कागदपत्रे तयार करून लाटली शिष्यवृती; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिली फिर्याद (Fraud)

अग्रवाल यांनी येस बँक, सावेडी शाखेमधून ३० लाख रुपयाची रक्कम सुशीला दर्शन जगताप यांच्या खात्यात ट्रान्सफर केली. मात्र, त्यानंतर ना कोणताही करारनामा झाला, ना एजन्सी मिळाली. अग्रवाल यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र, जगताप दांपत्य टाळाटाळ करु लागले आणि शेवटी फोन बंद ठेवू लागले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे अग्रवाल यांच्या लक्षात आल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.