Ahmednagar Merchants Co-op Bank Ltd : अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँकेला ‘शेड्यूल्ड बँक’ दर्जा प्राप्त

Ahmednagar Merchants Co-op Bank Ltd : अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँकेला 'शेड्यूल्ड बँक' दर्जा प्राप्त

0
Ahmednagar Merchants Co-op Bank Ltd : अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँकेला 'शेड्यूल्ड बँक' दर्जा प्राप्त
Ahmednagar Merchants Co-op Bank Ltd : अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँकेला 'शेड्यूल्ड बँक' दर्जा प्राप्त

Ahmednagar Merchants Co-op Bank Ltd : नगर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन दशकांनंतर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना ‘शेड्यूल्ड बँक’चा (Scheduled Banks) दर्जा देण्यास सुरुवात केली असून, याअंतर्गत महाराष्ट्रातील अहमदनगर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेला (Ahmednagar Merchants Co-op Bank Ltd) हा मान देण्यात आला आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमल मुनोत (Hastimal Munot) यांनी दिली.

नक्की वाचा : पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड

आरबीआय च्या विविध सवलती उपलब्ध होणार

बुधवारी (ता. ९) जारी करण्यात आलेल्या गॅझेट अधिसूचनेद्वारे, मर्चेंटस बँकेचा समावेश रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया अधिनियम, १९३४ च्या दुसऱ्या अनुसूचीत करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. ‘शेड्यूल्ड बँक’चा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना आरबीआय च्या विविध सवलती उपलब्ध होणार आहेत. यामध्ये लिक्विडिटी फॅसिलिटीज, क्लिअरिंग हाऊस सिस्टीममध्ये सहभागी होण्याचा हक्क, तसेच शासकीय प्रकल्पांना कर्ज देण्याचा अधिकार यांचा समावेश आहे. यामुळे बँकेची विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात मोठी वाढ होणार आहे.

अवश्य वाचा : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा

बँकेची घोडदौड कायम (Ahmednagar Merchants Co-op Bank Ltd)

मर्चंटस बँकेने नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. संस्थापक अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांच्या नेतृत्वाखाली बँकेची घोडदौड कायम असून त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या ३१ मार्च अखेर एकूण ठेवी १४६२ कोटी १६ लाख, एकूण कर्ज ९६८ कोटी ३९ लाख, निव्वळ नफा ७ कोटी ३ लाख, बँकेचा सी आर ए आर १५.७५ व नेट एन पी ए शुन्य टक्के आहे. सर्वोत्कृष्ट बँकिग सेवा देत मर्चेंटस बँकेने अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक बैंकिंग सेवा ग्राहकांना दिल्या आहेत. श्येडुल्ड बँकेचा दर्जा मिळणे ही बँकेसाठी ऐतिहासिक उपलब्धी आहे अशी भावना हस्तीमलजी मुनोत यांनी व्यक्त केली आहे.

Ahmednagar Merchants Co-op Bank Ltd : अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँकेला 'शेड्यूल्ड बँक' दर्जा प्राप्त
Ahmednagar Merchants Co-op Bank Ltd : अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँकेला ‘शेड्यूल्ड बँक’ दर्जा प्राप्त

ही सुधारणा आणि मान्यता केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकारामुळे शक्य झाली आहे. आता ५२ बँका शेड्यूल्ड बँक’ म्हणून मान्यताप्राप्त आहेत. ज्यामध्ये अहमदनगर मर्चंट्स बँकेचा समावेश झाला आहे. बँकेच्या या प्रगतीत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्याचेही महत्वपूर्ण योगदान आहे. या उपलब्धीबाबत उपाध्यक्ष अमित मुथा व सर्व संचालक मंडळाने आनंद व्यक्त केला आहे.