Mahatma Phule Samata Parishad : नगर : अखिल भारतीय अहिल्यानगर जिल्ह्यांतील ओबीसी (OBC) संघटनांचे पदाधिकारी व समता सैनिकांची महात्मा फुले समता परिषद (Mahatma Phule Samata Parishad) आढावा बैठक नगर शहरात शासकीय विश्रामगृह (Government Rest Houses) येथे समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली,
नक्की वाचा : पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड
ओबीसींच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी संघटनेचे कार्य
या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर सखोल संवाद साधत, संघटनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत मते जाणून घेतली. समता, सामाजिक न्याय आणि संघटन बळकटीकरणाच्या दिशेने निर्धार अधिक दृढ करावा, तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी व संघटनेचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी, प्रत्येक समतासैनिकाने जबाबदारीने आणि झोकून देऊन काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
अवश्य वाचा : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा
जबाबदारीने काम करण्याच्या सूचना (Mahatma Phule Samata Parishad)
या बैठकीत ओबीसी संघटनाचे पदाधिकारी व समतासैनिकांकडून आलेल्या सखोल, मार्गदर्शक आणि रचनात्मक सूचना हे संघटनेच्या भविष्याचा मार्ग उजळवणारे आहेत. या सूचनांचा योग्य अभ्यास करून त्यांचा अंमल करण्यात येईल, याची खात्रीही यावेळी देण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष बापू भुजबळ,माजी आमदार पांडुरंग अभंग, ॲड. सुभाष राऊत, प्रा. सत्संग मुंडे, समाधान जेजुरकर, डॉ. नागेश गवळी,राष्ट्रवादी ओबीसी शहराध्यक्ष अमित खामकर,माजी नगराध्यक्ष अभय आगरकर,फुले बिग्रेड अध्यक्ष दिपक खेडकर,संजय सर गारुडकर,प्रसाद भालके,आण्णासाहेब चौधरी,यशवंत पानमळकर,संतोष हजारे,ब्रिजेश ताठे,ऋषी ताठे,अभिषेक चिपाडे,नारायण इवळे, प्रकाश इवळे, जालिंदर बोरुडे,भरत गारुडकर,अनिल निकम ,स्वप्नील राऊत,विशाल तांबे,विलास शिंदे,बाळू खताडे,शंकर तुपे,संतोष शिंदे,पप्पु चौधरी, भैय्या चौधरी,अमोल बोरुडे,अजित चिपाडे,अनिकेत चिपाडे,सोनू चिपाडे,भाऊसाहेब चिपाडे,अविनाश शिंदे,योगेश शिंदे,दत्तात्रय शिंदे,व सर्व ओबीसी संघटना चे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.