Jayant Patil:मोठी बातमी!जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार 

0
Jayant Patil:मोठी बातमी!जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार 
Jayant Patil:मोठी बातमी!जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार 

Jayant Patil : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) दिल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. आता शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. १५ जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

नक्की वाचा : विश्वास नांगरे पाटील यांचा एआय चेहरा वापरुन सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ७८ लाखांची फसवणूक  

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी जयंत पाटील यांची मागणी  (Jayant Patil)

मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा,अशी मागणी जयंत पाटील यांनी १० जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. शरद पवारांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

अवश्य वाचा :  चित्रांगदा सिंग सलमान खानसोबत ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार  

जयंत पाटील नेमके कोण ? (Jayant Patil)

जयंत पाटील हे आधी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी वाट निवडल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि त्यानंतर उदयास आलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यपदाची धुराही शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या खांद्यावर आली. जयंत पाटील हे शरद पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे निष्ठावंत सहकारी आहेत. मात्र पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सलग दोन टर्म पूर्ण केल्याने आता नव्या चेहऱ्याला संधी मिळावी, अशी मागणी पक्षातील विविध नेत्यांकडून केली जात आहे.