Reporting Crimes : शिक्षण संस्थेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा; पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Reporting Crimes : शिक्षण संस्थेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा; पालकांची संतप्त प्रतिक्रिया

0
Reporting Crimes : शिक्षण संस्थेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा; पालकांची संतप्त प्रतिक्रिया
Reporting Crimes : शिक्षण संस्थेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा; पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Reporting Crimes : नगर : शाळा ही ज्ञान मंदिर आहे. या शाळेतून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. अनेक विद्यार्थी अधिकारी झाले असून चांगल्या पदावर काम करत आहेत. मात्र, काही गावातील विघ्नसंतोषी लोक विनाकारण शाळेची बदनामी (Defamation) करत आहेत. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, अशा लोकांवर कायदेशीर गुन्हे दाखल (Reporting Crimes) करावे, अशी मागणी पिंपळगाव माळवी व परिसरातील ग्रामस्थ असलेल्या पालकांनी केली आहे. शाळेच्या व मुख्याध्यापक (Principal) यांच्या पाठीशी उभे असल्याचे पालकांनी म्हटले आहे.

नक्की वाचा : जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार

आरोपांबाबत पालक मेळावा आयोजित

अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्री गोरक्षनाथ विद्या प्रसारक मंडळाचे श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेची बदनामी व मुख्याध्यापकांवर करण्यात आलेल्या बिना बुडाच्या आरोपांबाबत पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश झिने, सदस्य राम गुंड, बाप्पू बेरड, सागर गुंड, सरपंच राधिका प्रभुणे, उपसरपंच मच्छिन्द्र झिने, संतोष झिने, रावसाहेब भोसले, बाबासाहेब झिने, इंद्रभान बारगळ, माजी मुख्याध्यापक विजय गायकवाड, कैलास झरेकर, नवनाथ कदम, भाऊ कदम, गणेश जाधव, मुख्याध्यापक संभाजी पवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच डोंगरगण, मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी, आढाववाडी, धनगरवाडी परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reporting Crimes : शिक्षण संस्थेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा; पालकांची संतप्त प्रतिक्रिया
Reporting Crimes : शिक्षण संस्थेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा; पालकांची संतप्त प्रतिक्रिया

अवश्य वाचा : २९१ कोटीचा घोटाळा प्रकरणी अर्बन बँकेची ‘ईडी’कडून होणार चौकशी..!

शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न (Reporting Crimes)

श्रीराम विद्यालयात सुमारे ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यंदा पाचवीच्या वर्गात ६० ते ६५ विद्यार्थ्यानी नव्याने प्रवेश घेतला आहे. शाळेची गुणवत्ता वाढत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषी लोक शाळेची बदमानी करून मुख्याध्यापकावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. अशा लोकांवर कारवाई करावी. त्यांचा शाळेशी कसलाही संबंध नाही. विनाकारण शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळेची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावी अशी मागणी होत आहे.

Reporting Crimes : शिक्षण संस्थेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा; पालकांची संतप्त प्रतिक्रिया
Reporting Crimes : शिक्षण संस्थेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा; पालकांची संतप्त प्रतिक्रिया

पालकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या : गायकवाड
विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू मानून शासनाने आज गावोगावी, वाड्यावस्त्यावर शाळेची सुविधा शासनाने पुरविलेल्या आहेत. शासनाच्या नवनवीन धोरणे शाळेत अवलंबिले जातात. शाळा व्यवस्थापन समिती व शाळा शिक्षक, पालक संघ व शासन यांच्या मधील मुख्याध्यापक हा महत्वाचा दुवा असतो. त्यामुळे पालकांना विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले पाहिजे, असे मत माजी मुख्याध्यापक विजय गायकवाड यांनी व्यक्त केले.

पालकांच्या सहमतीने ड्रेस घेतले; झिने
डोंगरगण, मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी, आढाववाडी, धनगरवाडी परिसरातून सुमारे ७०० विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शाळेत येत आहेत. या शाळेची गुणवत्ता चांगली आहे. विद्यार्थ्यांच्या ड्रेसबाबत जे काही आरोप करण्यात आले आहेत. ते पालकांच्या विचाराने घेण्यात आले आहेत. त्यांच्यावर कुठलीही सक्ती करण्यात आली नाही. त्याने जे आरोप केले आहेत ते सिद्ध करावेत अन्यथा शाळेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

योगेश झिने
अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती,
श्रीराम विद्यालय, पिंपळगाव माळवी