Nilesh Lanke : गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवावी; खासदार लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Nilesh Lanke : गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवावी; खासदार लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
Nilesh Lanke : गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवावी; खासदार लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Nilesh Lanke : गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवावी; खासदार लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Nilesh Lanke : नगर : आगामी जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील गट व गण रचना २०१७ साली अस्तित्वात असलेल्या जुन्याच स्वरुपात कायम ठेवावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector) निवेदनाद्वारे केली आहे.

नक्की वाचा : जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

२०१७ साली ज्या गट व गण रचनेच्या आधारे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडल्या, त्या रचनेमध्ये त्यानंतर कोणताही नविन गट अथवा गण समाविष्ट करण्यात आलेला नाही. परिणामी, नव्याने कोणतीही फेररचना करण्याची आवश्यकता नाही.

अवश्य वाचा : २९१ कोटीचा घोटाळा प्रकरणी अर्बन बँकेची ‘ईडी’कडून होणार चौकशी..!

प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता (Nilesh Lanke)

गट व गण रचनेच्या प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे निवडणुकांच्या पारदर्शकतेवर व निष्पक्षतेवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे गट व गण रचनेत कोणतेही बदल न करता ती २०१७ मधील जुन्याच स्वरुपात ठेवावी, ही ठाम मागणी करण्यात आली आहे.

गट व गण रचनेत कोणताही बदल न केल्यास जिल्ह्यातील सामाजिक समता व राजकीय स्थैर्य टिकून राहील. कोणत्याही वर्ग अथवा गटावर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, अशी अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.