Toronto Jagannath Rathyatra : कॅनडाच्या टोरंटो (Toronto) शहरामध्ये जगन्नाथ रथयात्रेवर (Jagannath Rathyatra) अंडी फेकल्याचा (Throwing Eggs) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत केंद्र सरकारने त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या रथयात्रेत सहभागी झालेल्या एका भारतीय महिलेनं केलेल्या सोशल मीडिया पोस्टनंतर हा प्रकार उघड झाला. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. हे कृत्य करणाऱ्यांना त्वरीत शिक्षा करावी,अशी मागणी केली आहे. भारतीय परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील गट व गण रचना जाहीर; तुमचे गाव कुठे जाणून घ्या…
टोरंटोमध्ये नेमकं घडलं काय ? (Toronto Jagannath Rathyatra)
सध्या ओडिसामध्ये जगप्रसिद्ध असलेली जगन्नाथ पुरी यात्रा चालू आहे. या पार्श्वभूमीवर कॅनडाच्या टोरंटोमध्ये राहणाऱ्या भारतीयांनीही सोमवारी एकत्र येऊन छोट्या स्वरूपात एक रथयात्रा काढली होती. मात्र या रथयात्रेवर काही लोकांनी अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका महिलेनं यावेळी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमधून घडलेला प्रकार समोर आला आहे. “आम्ही इथे रथयात्रा काढत असताना बाजूच्या इमारतीवरून काही अंडी आमच्या दिशेनं फेकण्यात आली. तर दुसरीकडे कॅनडा सरकार म्हणतंय की त्यांच्याकडे वंशभेद होत नाही”, असं या व्हिडीओमध्ये ही महिला म्हणताना दिसत आहे.
अवश्य वाचा : कर्जत शहरात रास्ता रोको आंदोलन
केंद्र सरकारची तीव्र नाराजी (Toronto Jagannath Rathyatra)
टोरंटो शहरातील या घटनेनंतर केंद्र सरकारने यासंदर्भात कॅनडा सरकारकडे आपली परखड भूमिका मांडली आहे. “टोरंटो मधील रथयात्रेदरम्यान काही खोडसाळ लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याची बाब आमच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई केली जावी, अशी स्पष्ट मागणी आम्ही कॅनडा सरकारकडे केली आहे. लोकांच्या धार्मिक अधिकारांचं रक्षण करण्यासाठी कॅनडा सरकार योग्य ती कारवाई करेल, अशी आम्हाला आशा आहे”, असं रणधीर जयस्वाल यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.