Lack of Electricity : स्मशानभूमीत लाईटची सोय नसल्याने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात केले अंत्यसंस्कार

Lack of Electricity : स्मशानभूमीत लाईटची सोय नसल्याने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात केले अंत्यसंस्कार

0
Lack of Electricity : स्मशानभूमीत लाईटची सोय नसल्याने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात केले अंत्यसंस्कार
Lack of Electricity : स्मशानभूमीत लाईटची सोय नसल्याने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात केले अंत्यसंस्कार

Lack of Electricity : राहुरी: शहरातील गणपती घाट येथील स्मशानभूमीत (Cemetery) रात्रीच्या वेळेस अंत्यसंस्कार (Funeral) करताना लाईटची पुरेशी व्यवस्था नव्हती (Lack of Electricity). नातेवाईकांना मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाशाचा आधार घेत अंत्यसंस्कार करुन वेळ निभवावी लागली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यावर पालिकेचा विद्युत विभाग खडबडून जागा झाला. वीज व्यवस्था पुरेशी होती, असा दावा करणाऱ्या राहुरी पालिकेच्या वीज विभागाने त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न केला.

नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप  

ही घटना नागरिकांमध्ये ठरली चर्चेचा विषय

नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेषतः अशा परिस्थितीत नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो, याकडे पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या घटनेमुळे गणपती घाट स्मशानभूमीत लाईटची पुरेशीव्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा पुरवण्याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश  

स्मशानभूमीतील निम्मे लाईट नादुरुस्त (Lack of Electricity)

येथील राजेश नगरकर यांच्या अंत्यविधीप्रसंगी गणपती घाट या स्मशानभूमीतील निम्मे लाईट नादुरुस्त होते. त्यामुळे बराचसा भाग अंधारातच होता. राहुरी नगरपरिषद प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी सौरदिव्यांची संख्या वाढवावी. केवळ उंचावरील दिव्यांऐवजी तेथील दिव्यांच्या दिशा गरजेनुसार बदलाव्यात. जेणेकरून जेथे प्रकाश आवश्यक आहे तेथे तो उपलब्ध होईल. नागरिकांना मोबाईल टॉर्चचा आधार घेण्याची नामुष्की ओढवणार नाही, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सौरभ उंडे यांनी केली आहे.