Prakash Chitte : भाजप नेते प्रकाश चित्तेंवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Prakash Chitte : भाजप नेते प्रकाश चित्तेंवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

0
Prakash Chitte : भाजप नेते प्रकाश चित्तेंवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
Prakash Chitte : भाजप नेते प्रकाश चित्तेंवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Prakash Chitte : श्रीरामपूर: तालुक्यातील भाजप (BJP) नेते प्रकाश चित्ते (Prakash Chitte) यांच्या विरोधात महिलेने केलेल्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटीसह (Atrocities) अन्य विविध कलमाअंतर्गत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. चित्ते यांच्यासह रिजवान कुरेशी या अन्य एका जणाविरुद्ध हा गुन्हा दाखल (Crime filed) झाल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप  

ऐकले नाही तर संपवून टाकण्याची धमकी

याबाबत पुणे येथे राहणाऱ्या महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादित म्हटले आहे की, मी मुल्ला कटर याचेविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याची सुनावणी सध्या सेशन कोर्ट, श्रीरामपूर येथे चालू आहे. या केसच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी मला अधुनमधून श्रीरामपूर येथे यावे लागते. साधारण ८ ते १० दिवसांपूर्वी मी माझ्या खासगी कामासाठी श्रीरामपूर येथे आले होते. माझे कामकाज आटोपून दुपारच्या वेळी मी पुण्याला परत जाण्यासाठी निघाले होते. श्रीरामपूर बस स्टॅन्डकडे जाण्यासाठी मी नेवासारोडचा बोगदा ओलांडून पुढे चालत जात असताना एक पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवर श्रीरामपूर येथील मी ओळखत असलेले प्रकाश चित्ते हे माझ्याजवळ आले व त्यांनी मला थांबण्यास सांगितले. मी थांबल्यानंतर ते मला म्हणाले की, तु मुल्ला कटरच्या विरुध्द साक्ष देवू नको. त्याने काहीच केले नाही, असे तू कोर्टात सांग. तो माझा कार्यकर्ता आहे. तु माझ्या सांगण्याप्रमाणे साक्ष दिली तर तुला मी दोन लाख रुपये देईल आणि माझे ऐकले नाही तर तुला कुठे संपवून टाकील ते कळणार नाही. तु पुढच्या वेळी श्रीरामपुरला आली की, मुल्ला कटरचा भाऊ तुला भेटेल. तेव्हा तुला ५० हजार रुपये देईल. बाकी पैसे काम झाल्यावर भेटतील, असे म्हणुन ते तेथून निघून गेले. त्यानंतर घाबरून मी श्रीरामपूर बस स्टॅन्ड येथून बस पकडून पुण्याला निघुन गेले. घाबरुन मी याबाबत कुणालाही सांगितले नाही.

अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश  

महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल (Prakash Chitte)

१९ जुलै रोजी माझी वरील गुन्हयात साक्ष असल्याने १५ जुलै रोजी माझे केसची माहिती घेण्यासाठी मी श्रीरामपूर कोर्टात आले होते. त्याकरीता मी पुण्यावरुन बसने रात्री नेवासा फाटा येथे उतरले. तिथे मी एका लॉजवर रूम घेऊन राहिले. तेव्हा तेथे सकाळी गुन्हा दाखल केलेला आरोपी मुल्ला कटरचा भाऊ रिजवान कुरेशी आला व म्हणाला की, माझ्यासोबत गुपचुप चल. मी त्याच्या गाडीवर बसून श्रीरामपूर कोर्टात गेले. तिथे एक वकील होते. त्या ठिकाणी त्यांनी माझे एका कोऱ्या कागदावर सही व अंगठे घेतले. त्यानंतर मी कोर्टापासून रिक्षा भाडोत्री केली व मला बस स्टॅण्डला सोडण्यास सांगितले. मी रिक्षात बसून श्रीरामपूर बस स्टॅण्ड येथे उतरले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, मुल्ला कटरचा भाऊ रिजवान हा माझा पाठलाग करत आहे. मी रिक्षाने नेवासा रोडने जात असताना दुपारी तीनच्या सुमारास रेल्वे उड्डाणपुलावर रिक्षा येताच रिजवान कुरेशी याने रिक्षा थांबवली. तो मला म्हणाला की, तु माझा भाऊ याच्या विरुध्द साक्ष दिली तर आम्ही तुला मारुन टाकू. तु जर आमच्या बाजूने साक्ष दिली तर आम्ही तुला दोन लाख रुपये देऊ. वाटल्यास लगेच आता तुला ५० हजार रुपये देतो, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून माझ्या भावाच्या विरुध्द जर साक्ष दिली तर तुला मारून टाकील, अशी धमकी दिली. त्याचवेळी तिथे माझे ओळखीचा एक जण आला असता रिजवान कुरेशी तेथुन निघून गेला. तेव्हा माझी खात्री झाली की, प्रकाश चित्ते यांच्या सांगण्यावरुनच रिजवान कुरेशी याने मला धमकी दिली. या महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिसांनी प्रकाश चित्ते व रिजवान कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.