Police : नगर : पोलिसांच्या (Police) विशेष पथकाने कोपरगाव, नेवासा व पाथर्डी तालुक्यांतील अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transportation) व अवैध दारू बाळगणाऱ्यांवर छापे टाकले. यात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून ६१ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई विशेष पोलीस पथकाचे परिवीक्षाधीन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे (Santosh Khade) यांच्या पथकाने आज (ता. १६) पहाटे केली.
नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप
अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती
अर्जुन भाऊसाहेब गुरुळे (वय.४०, रा. मुर्शदपूर, ता. कोपरगाव), संतोष लक्ष्मण ठमके (वय. ३०), गणपत पंडित पवार वय २७, रा. पारेगाव, ता. येवला, नाशिक), अमोल वंसत मांडगे रा.कोपरगाव), रामा कुदळे रा. कोळपेवाडी), अजय शेळके यांच्यावर अवैध वाळू वाहतूकीबाबत कोपरगाव गुन्हा दाखल कारण्याता आला आहे. त्यांच्याकडून ५५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा परिसरात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई (Police)
त्यानुसार पथकाने सापळा रचून ६ लाख ८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसरा झाला. याबाबत पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच नेवासा व पाथर्डी तालुक्यात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, शंकर चौधरी, अरविंद भिंगारदिवे, अजय साठे, दिंगबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनील पवार, सुनील दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, दीपक जाधव, विजय ढाकणे, जालिंदर दहिफळे यांच्या पथकाने केली.