Martyred Soldier : संदीप घोडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Martyred Soldier : संदीप घोडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
Martyred Soldier : संदीप घोडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Martyred Soldier : संदीप घोडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Martyred Soldier : संगमनेर : नवी दिल्ली येथे केंद्रीय गुप्तचर विभागात (Intelligence Bureau) कार्यरत असणारे सीआरपी एफचे शहीद जवान (Martyred Soldier) जवान संदीप घोडेकर (Sandeep Ghodekar) यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्यावतीने तसेच केंद्रीय सीआरपीएफ (CRPF) जवानांच्या वतीने हवेमध्ये बंदुकीच्या पाच फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. मेजर जवान संदीप घोडेकर यांचे पुत्र यश घोडेकर व बंधू गणेश घोडेकर यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देत संगमनेरकरांनी संदीप घोडेकर यांना अखेरचा निरोप दिला.

नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप  

उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली येथे केंद्रीय गुप्तचर विभागात कर्तव्यावर कार्यरत असताना मेजर संदीप घोडेकर यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यामुळे ते स्वतः दिल्लीतील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची मंगळवारी प्राणज्योत मालवली.

अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश  

अखेरचा निरोप देताना अनेकांना गहिवरून आले (Martyred Soldier)

नवी दिल्ली येथून मेजर घोडेकर यांचे पार्थिव लष्करी विमानाने पुणे येथे आणण्यात आले. पुणे येथून लष्करी वाहनातून संगमनेर येथे आणले. त्यानंतर काहीवेळ त्यांच्या घोडेकर मळा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर संगमनेर शहरातून मिरवणूक काढली आणि प्रवरा नदीतीरावरील अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मेजर संदीप घोडेकर यांची आई, पत्नी, मुलगा व इतर नातेवाईकांना गहिवरून आले होते. आपल्या तालुक्याच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देताना अनेकांना गहिवरून आले.