Fake Marriage : श्रीगोंदा: तालुक्यातील घोगरगाव येथील तरुणाशी एजंटचे मदतीने तीन लाख रुपये घेत बनावट लग्न (Fake Marriage) करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस राहून घरातील रोख रक्क्म चोरुन (Cash Theft) घेऊन जाणाऱ्या बनावट नवरीसह नवरीच्या मावस भावाची भूमिका निभावणाऱ्या आकाश तोताराम सुरोशे (वय ३१, रा. दहिद बुद्रुक, ता.जि. बुलढाणा) या दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी (Shrigonda Police) जेरबंद करुन बनावट लग्न करुन फसवणाऱ्या (Fraudsters) टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणातील शिवाजी राठोड, ऋषाली ठाकूर, सुरोशे (पूर्ण नाव माहीत नाही ) हे तीन जण फरार आहे.
नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप
लग्नानंतर सहा महिन्यांनी फसवणूक
यातील बनावट नवरी आणि तिचा मावस भाऊ आकाश सुरोशे या दोघांवर धांबोळा (जि. डुंगरपूर, राजस्थान) येथे देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोगरगाव येथील एका तरुणाचे बुलढाणा परिसरातील तरुणीशी मध्यस्थांच्या माध्यमातून बनावट तयार केलेले नातेवाईक यांनी तीन लाख रुपये घेत १४ डिसेंबर २०२४ रोजी आळंदी देवाची, पुणे येथे सध्या पद्धतीने लग्न लावले. लग्नानंतर बनावट नवरीने काही दिवस राहुन घरातील रोख रक्कम घेऊन पळ काढला. लग्नानंतर सहा महिन्यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्या तरुणाने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश
बनावट लग्न करुन फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश (Fake Marriage)
श्रीगोंदा पोलिसांनी गुन्ह्याचा तांत्रिक तसेच गुप्त बातमीदारामार्फत तपास करत बनावट नवरी तसेच मावस भावाची भूमिका करणारा आकाश तोताराम सुरोशे या दोघांना बुलढाणा तसेच संभाजीनगर येथून सापळा रचून १४ जुलै रोजी ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक तपास करत त्यांच्यासह इतर तीन जणांचा गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न करत बनावट लग्न करुन फसवणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संग्राम जाधव, संदिप शिरसाठ, रवी जाधव, संदीप राऊत, अरुण पवार, संदीप आजबे, मयुर तोरडमल, अलका वाघ यांनी केली.