
Devendra Fadnavis : राज्यात दिवसेंदिवस मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण (The number of missing women) सतत वाढत आहे. त्यामुळेच आता बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी ‘शोध मोहीम’ (Search Mission) म्हणजेच ‘ऑपरेशन शोध’ सुरू करण्यात येणार आहे. शिवाय बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारच्या बेपत्ता संकेतस्थळाचाही उपयोग केला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत दिली. बेपत्ता होणाऱ्या मुलींची आणि महिलांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. या संदर्भात राज्य सरकार काय उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न सुनिल शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा : आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…
राज्यात महिलांच्या बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ (Devendra Fadnavis)
राज्यात महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या बाबतचा गुन्हा दाखल करणे अनिवार्य झाले आहे. बेपत्ता झालेल्यांचा तीन ते चार वर्ष शोध सुरू असतो, त्यानंतर शोध थांबतो. दीड ते दोन वर्षांत बेपत्ता झालेल्यापैकी ९४ – ९६ टक्के महिलांचा शोध घेतला जातो. मात्र ३ ते ४ टक्के महिला सापडत नाहीत. संबंधितांच्या घरचेही पाठपुरावा करीत नाहीत. पोलिसही नव्याने बेपत्ता झाल्याचे गुन्हे दाखल होत असल्यामुळे जुन्या गुन्ह्यांचा शोध थांबवितात. त्यामुळे आता राज्यात बेपत्ता कक्ष म्हणजेच मिसिंग सेल स्थापन करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले… (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांकडे हे काम देण्यात आले आहे. या शोध मोहिमे अंतर्गत १७ एप्रिल ते १५ मे, या एका महिन्यात ४९६० महिला आणि १३६४ बालकांचा शोध लावण्यात आला आहे. त्यापैकी १०६ महिला आणि ७०३ बालके अशी सापडली की, त्यांची कुठे नोंद नव्हती, गुन्हे दाखल झालेले नव्हते. हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत. केंद्र सरकारने सुरू केलेल्या बेपत्ता संकेतस्थळावर सर्व राज्यांनी माहिती भरायची आहे.