Devendra Fadnavis : नगर : अहिल्यानगर जिल्हा हा राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा असून, अहिल्यानगर जिल्ह्याला लवकरच आणखी नवे सहा पोलीस ठाणे (Police Station) मंजूर झाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. तसेच ५५० अतिरिक्त मनुष्यबळही (Additional Manpower) देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा : आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार
अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. जिल्ह्यात आज अखेर ३२ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. वाढती लोकसंख्या तसेच गुन्ह्याचे प्रमाण पहाता गृहविभागाने आणखी सहा पोलीस ठाण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यातील एका पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. उर्वरित पोलीस ठाणे लवकरच मंजूर होतील. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार आहे.
अवश्य वाचा : जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; मनोज कोतकर विरोधात गुन्हा
आमदार विक्रम पाचपुते केला होता प्रश्न उपस्थित (Devendra Fadnavis)
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या काळात नवीन पोलीस ठाण्याबाबत प्रस्ताव संबंधित प्रशासनाला सादर केला होता. याबाबत श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी पुन्हा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यभरात पोलीस विभागाची नव्याने रचना करण्यात येत आहे. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नवी सात पोलीस ठाणे मिळणार आहेत. त्यातील एक मंजूर झाले असून उर्वरित सहा लवकरच मंजूर होतील, असे ही त्यांनी सांगितले आहे.