Raid : वांबोरीत सुगंधी तंबाखू व मावा विक्रेत्यावर छापा; एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Raid : वांबोरीत सुगंधी तंबाखू व मावा विक्रेत्यावर छापा; एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
Raid : वांबोरीत सुगंधी तंबाखू व मावा विक्रेत्यावर छापा; एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Raid : वांबोरीत सुगंधी तंबाखू व मावा विक्रेत्यावर छापा; एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Raid : नगर : राहुरी (Rahuri) तालुक्यातील वांबोरी परिसरात अवैध सुगंधी तंबाखू विक्रत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून (Raid) एक संशयित ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात (Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतील हजारो अर्ज बाद;नव्या नोंदी बंद

ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव

राहुल गोरक्षनाथ जाधव (वय ३०, रा.वांबोरी, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. आरोपीकडे मुद्देमाला बाबत विचारपूस केली असता अमोल गोरक्षनाथ जाधव (रा.वांबोरी, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर), असे मिळून मावा तयार करत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : ‘त्या’ बोगस कारभाराची एसआयटी चौकशी करा; आमदार संग्राम जगताप यांची विधिमंडळात मागणी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई (Raid)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार वांबोरी-देहरे रोडवरील मोरे वस्तीवर एका घरात मावा तयार केला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत एक लाख ४६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, रणजीत जाधव, विशाल तनपुरे यांच्या पथकाने केली.