
Somnath Suryavanshi Death : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विधानभवनात (Vidhan Bhavan) धडधडीत खोटं बोललेत. त्यांचे हे बोलणे म्हणजे महाराष्ट्राला आणि संविधानाला कलंक लावण्याचे काम आहे. माझ्या मुलाला पोलिसांनी मारले, घाटी रुग्णालयात न्यायधीशांसमोर शवविच्छेदन केले तो रिपोर्ट खोटा आहे का ? असा सवाल सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी (Vijayabai Suryavanshi) यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतील हजारो अर्ज बाद;नव्या नोंदी बंद
शवविच्छेदनाचा रिपोर्ट खोटा आहे का ? (Somnath Suryavanshi Death)
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहे. अशातच आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारत देवेंद्र फडणवीस हे विधानभवनात धडधडीत खोटं बोलले असल्याचा आरोप केला आहे. माझ्या मुलाला पोलिसांनी मारले, त्याचे शव विच्छेदन न्यायाधीशांसमोर करण्यात आले त्याचा रिपोर्ट काय खोटा आहे का ? असा सवाल करत मुख्यमंत्री धडधडीत विधान भवनात खोटे बोलले असुन त्यांचं बोलणं हे महाराष्ट्र आणि संविधानाला कलंक असल्याचेही त्या म्हणाला.
अवश्य वाचा : ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’;’या’ दिवशी होणार प्रदर्शित
“माझ्या मुलांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालू नका” – विजयाबाई सूर्यवंशी (Somnath Suryavanshi Death)
माझ्या मुलांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालू नका,असे आवाहन दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केल आहे. जे जे मध्ये जे रिपोर्टसाठी सरकार गेले त्याची माहिती आणि परवानगी आमच्याकडून घेण्यात आली नाही किंवा सांगण्यात ही आले नसल्याचे त्या म्हणाल्या आहे.