School Grant:विनाअनुदानित शाळांना दिलासा,१ ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अनुदान

0
School Grant:विनाअनुदानित शाळांना दिलासा,१ ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अनुदान
School Grant:विनाअनुदानित शाळांना दिलासा,१ ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अनुदान

School Grant : मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidan) विनाअनुदानित शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन (Agitation) सुरू केले होतं. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश आलं आहे. येत्या १ ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा राज्य मंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी विधानपरिषदेत (Vidhanparishad) केली आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतील हजारो अर्ज बाद;नव्या नोंदी बंद 

१ ऑगस्टपासून अनुदान जमा होणार (School Grant)

खासगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा आणि कार्यरत शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना येत्या १ ऑगस्टपासून वेतन अनुदानाचा पुढील टप्पा देण्यासाठी आवश्यक निधीला  मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. या वेतनासाठी दरवर्षी ९७० कोटी ४२ लाख रुपये एवढा खर्च होणार आहे.

अवश्य वाचा : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात धडधडीत खोटं बोलले”;सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा संताप 

शिक्षकांच्या लढ्याला यश (School Grant)

राज्य सरकारनं ऑक्टोबर २०२४ मध्ये शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार २० टक्के अनुदान देण्यात येणार होतं. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. शाळांना प्रत्यक्ष निधी वितरित करण्यात आलेला नव्हता. या निर्णयानंतर दोन अधिवेशनं पार पडली, तसेच तिसरं अधिवेशन सुरू असतानाही सरकारकडून टप्पा अनुदानासाठी आवश्यक असलेली पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली नव्हती. परिणामी, शिक्षक समन्वय संघानं तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघाकडून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं.अखेर त्यांच्या या लढ्याला यश आलं आहे.