Manoj Jarange:”दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही”- मनोज जरांगे 

0
Manoj Jarange:
Manoj Jarange:"दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही"- मनोज जरांगे 

Manoj Jarange : दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही. जुनी म्हण आहे की “मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे.” कोणत्याही पक्षाचा असला, तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावे असं होतं, मात्र कशासाठी म्हणत होते माहिती नाही. दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे. वेगळे लढले तरी पडतात, मग एकत्र येऊन पडू द्या. मात्र लोकांची इच्छा आहे ना दोन ठाकरेंनी एकत्र यावं मग त्यांनी एकत्र यावं. आमचा काही फायदा नाही, एकदा होऊन जाऊ द्या, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. 

नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतील हजारो अर्ज बाद;नव्या नोंदी बंद 

मनोज जरांगेंनी नेमकं काय सांगितलं ? (Manoj Jarange)

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, मागील वेळी मोर्चा लोणावळा मार्गे मुंबई होता. मात्र,यावेळी हा मोर्चा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेजमार्गे कल्याण, ठाणे, चेंबूर करुन आझाद मैदानावर धडकणार आहे. माळशेज घाटातून खाली उतरल्यावर मराठ्यांचा मोर्चा हा एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातून निघणार आहे. याबाबत विचारलं असता जरांगेंनी सांगितले की, आम्ही निस्वार्थी भावनेनं पुढे जात आहोत. कल्याणमार्गे जवळचा रस्ता असल्याने हा मार्ग निवडला. पहिल्यापेक्षा पाचपटने अधिक संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी असेल. अंतरवाली मार्गे अहिल्यानगर, शिवनेरी,माळशेज घाट, कल्याण मार्गे मुंबईत धडकणार असल्याचे ही म्हणाले.

‘परत माघारी येईल याची खात्री नाही’ (Manoj Jarange)

मागीलवेळी मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली होती. यावर बोलताना आम्ही कुणाच्या सांगण्यावरुन थांबत नाही,असा टोला जरांगेंनी लावला. हा मोर्चा शिंदे ना टार्गेट आहे असे छक्केपंज्जे खेळत नाही. मी थोड्या दिवसाचा पाहुणा असून माझे शरीर मला साथ देत नाही. जाताना शिवनेरीची माती कपाळाला लावून जाणार आहे. परत माघारी येईल याची खात्री नाही, असं देखील जरांगेंनी सांगितले आहे.